संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 4 लक्ष 20 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी गावातील एका नामवंत लॉन समोरील मोकळ्या जागेत अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाई काल रात्री 8 दरम्यान केली असून या धाडीतून 9 जुगाऱ्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला .यातील चार जुगाऱ्याना ताब्यात घेण्यात आले तर पाच जुगारी पसार आहेत.या कारवाहितुन रोख रक्कम 3810 रुपये, ताश पत्ते किमती 200 रुपये, दोन दऱ्या 1000 रुपये,सहा महागड्या दुचाकी,दोन महागडे मोबाईल असा एकूण 4 लक्ष 20 हजार दहा रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्या 9 आरोपी पैकी अटक आरोपी मध्ये फैजाण अहमद मोहम्मद अयुब वय 30 वर्षे रा वारीसपुरा, कामठी,मोहसीन अहमद शकील अहमद वय 30 वर्षे रा नया बाजार कामठी,मो शहबाज वय 30 वर्षे रा नया बाजार कामठी,खालिद कमाल वकील अहमद वय 36 वर्षे रा प्रबुद्ध नगर कामठी तर पसार आरोपीत आसिफ,कुर्बान,मुस्तकीन जमाल व इतर दोन आरोपीचा समावेश आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप भिताडे व सहकारी पोलीस पथकाने केली.