संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कादरझेंडा परिसरात शफीफ निझामी यांच्या बंद घरात गुप्तचर पद्ध्तीने अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून सहा जुगाऱ्याना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर मजुका कलम 4/5 सहकलम 49 बीएनएस 2023 अनव्ये गुन्हा नोंदवून आरोपिताकडून नगदी 5 हजार 600 रुपये,विविध कंपनीचे सहा मोबाईल किमती 69 हजार रुपये,दोन ऍक्टिवा मोपेड दुचाकी किमती 1 लक्ष रुपये असा एकूण 1 लक्ष 74 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही यशस्वी कारवाई मध्यरात्री 3 दरम्यान करण्यात आली.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा आरोपिताध्ये साहिल शेख वय 18 वर्षे रा लुम्बिनी नगर कामठी,मोहम्मद अदनान मो इम्रान वय 22 वर्षे रा कादरझेंडा,फैज खान युनूस खान वय 20 वर्षे रा कादरझेंडा, मो रिझवान मो इकबाल वय 19 वर्षे रा कादरझेंडा, शाहरुख खान करीम खान वय 21 वर्षे रा कादरझेंडा, अदनान निझामी शाफिक निझामी वय 18 वर्षे रा कादरझेंडा कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे,पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम, पोलीस हवा .मेहमूद अन्सारी, गावंडे,रमेश बंजारा,गोपाल टिके,विजय गाते,ताराचंद साबरे, पवन भुले,तुमाराम वाझे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.