संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
स्थागुअ शाखा नागपुर (ग्रा) ची कारवाई, १८,३०० रूपयाचा मुद्देमाल जप्त.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर येथे स्थानि क गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण च्या पथकांनी जुगार खेळतांनी सहा आरोपी ला पकडुन त्यांचा जवळुन एकुण १८,३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.१८) जुन ला दुपारी १ ते १:१५ वाजता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक कन्हान परिसरात पेट्रो लिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की सत्रापुर येथे काही इसम जुगार खेळत आहे. अश्या विश्वसनीय माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सत्रापुर येथे जाऊन पाहणी केली असता तिथे ५२ तास पत्यावर पैशाची बाजी लावुन हार जीत चा जुगार खेळ खेळतांनी मिळुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने आरोपी १) विरेंद्र रविंद्र गायकवाड वय २३ वर्ष २) बाॅबी मुन्ना पात्रे वय २४ वर्ष ३) विकास नेवालाल भिसे वय २६ वर्ष ४) चेतन सज्जन पात्रे वय २७ वर्ष ५) वनील मुलचंद लोंढे वय २९ वर्ष ६) राजन गोविंदा भिसे वय ४८ वर्ष सर्व राह. सत्रापुर कन्हान यांना पकडुन त्यांचा जवळुन नगदी १८,००० रुपये व लाल रंगाची दरी किंमत अंदा जे ३०० रुपये असा एकुण १८,३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोस्टे ला फिर्यादी स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी सहा आरोपी विरुद्ध अप क्र. ३७२/२२ कलम १२ मजुका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे हे करीत आहे.