संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 7 :- येथील भाजी मंडी परिसरातील राकेश कनोजिया, मोहित राणे व सानु ग्रावकर च्या वतीने डॉन्स स्नुकर क्लब येथे नुकतेच 5 सप्टेंबर ला आयोजित स्नुकर टूर्नमेंट स्पर्धेत राहुल राणे 17 पॉईंट ने बाजी मारून प्रथम क्रमांकाने विजयी झाले.तर आशु रॉय 8 पॉईंट ने द्वितीय क्रमांक तसेच योगेश राणे 11 पॉईंट ने तृतीय क्रमांकाने विजयी झाले.तर अंडर वयातील सागर राणे प्रथम क्रमांकाने विजयी झाले.
या स्पर्धेतील समस्त विजेत्यांचा स्पर्धेचे आयोजक राकेश कनोजिया तसेच मोहित राणे तसेच सानु ग्रावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना सुद्धा सहभागी प्रशस्ती देऊन सम्माणीत करण्यात आले.