राहुल गांधींनी केला रमानगरच्या प्रमोद खोब्रागडेचा गौरव

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कांग्रेस च्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपूरच्या ‘भारत जोडो मैदान’येथे ‘है तैयार हम’ अविराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कांग्रेस चे निष्ठावंत पदाधिकारी कामठी येथील रमानगर रहिवासी व प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठीचे संयोजक प्रमोद खोब्रागडे यांचा सभास्थळी प्रमाणपत्र देऊन गौरव केला. ज्यामुळे कामठी शहराचे नाव उंचावण्यात अजून एक भर पडली.

‘है तयार हम’या महारैलीत सभास्थळावर कांग्रेस ने पक्षाला देणगीसाठी 12 हजार ठिकाणी ‘क्यू आर कोड’लावले होते. खुर्च्यांच्या मागे क्यूआर कोडचे स्टिकर चिकटविण्यात आले होते.यावर पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे छायाचित्र असून 138 वर्षांपासून लोकांच्या सेवेत असलेल्या कांग्रेस ला 138 रुपये वा आपल्या इच्छेनुसार देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले होते तसेच क्यू आर कोड स्कॅन करून 138 रुपये,1380 रुपये,13,080 रुपये व एक लक्ष 38 रुपये देणगीचे पर्वच यात होते. या सभास्थळातून क्यू आर कोड स्कॅन केलेल्यापैकी तीन लकी नावे काढण्यात आले ज्यांचा सत्कार करण्याचे नियोजित होते त्यानुसार या तीन लकी नावांमध्ये अयोध्यानगर येथील पूजा देशमुख,सोनेगाव येथील रेखा बाराहाते तर कामठीच्या प्रमोद खोब्रागडे च्या नावाची वर्णी लागली .या तिघांनाही राहूल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या लकी ठरलेल्या तीन नावांमध्ये कामठी च्या प्रमोद खोब्रागडे च्या नावाची वर्णी लागल्याने आनंदाची लहर पसरली तर या गौरव सत्कारा बद्दल प्रमोद खोब्रागडे यांच्यावर प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट च्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव करीत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे संयोजक राजेश गजभिये,गीतेश सुखदेवें,विकास रंगारी,कोमल लेंढारे,मंगेश खांडेकर, आनंद गेडाम, आशिष मेश्राम,राजन मेश्राम, मनोज रंगारी, रायभान गजभिये, बालकदास डोंगरे, गंगा वंजारी, कृष्णा पटेल, सलमान अब्बास, सलीमभाई आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Fri Dec 29 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार (ता.२९ ) ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. महालक्ष्मी रिऍलीटीज, पांडे ले आऊट, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. छोटी लाहोरी बार अँड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com