कन्हान :- आर.एम.सी. कंपनी द्वारे कन्हान, मौदा व रामटेक येथील घरगुती मिटर बदली थांबविण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य हयांना निवदेनातुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रामटेक लोकसभा क्षेत्र माजी मिडीया प्रमुख हबीब शेख हयानी केली आहे.
कन्हान शहर मध्ये आर.एम.सी. कंपनी द्वारे होत असलेले मिटर बदली हे ग्राहकांना न विचारता विना नोटीस, स्थानिय नगरपरिषद व स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाण पत्र न घेता अवैध पद्धतीने अरेरावी करून कंत्राटदार मिटर बदली करून नविन लावत आहे. ग्राहकांनी महावितरण कं. कडुन स्वताचे मीटर खरेदी करून कंपनीला सर्वीस चार्ज देत आहे. आर. एम.सी.कंपनी आणि महावितरण कंपनी ग्राहकांना संतुष्टी व ग्राहकांच्या सहमती करीता काय केलेले आहे ? जर हे मिटर लावण्याची प्रक्रियेचा शासकीय आदेश आहे तर त्याचे जि.आर.किंवा आदेश प्रत कुठे आहे ? पेपर नोट कुठे आहे ? जे महावितरण कंपनीचे ग्राहक आहेत त्यांच्यावरच कार्यवाही आणि जे विधृत चोरी करतात त्यांच काय ? चोरी करणाऱ्यांच्या कारणाने रात्रभर लाईट बंद राहते. तसेच दिवस रात्र मेंटनेस व्यतिरिक्त दिवसरात्र विधृत लाईन बंद राहुन जे ग्राहक नियमित बिल भरतात त्याच ग्राहकांना भयंकर त्रास सहन करावा लागतो त्यांच्या साठी आपण काय उपाय करू शकता ? हया संभाव्य प्रश्नांची उत्तरे आपण ग्राह कांना देणार याची हमी आपण आम्हाला दयावी.
कन्हान शहरातील महावितरण कंपनी अंतर्गत येणारे एल टी कंडक्टर तार हे बदलवुन एल बुंथ केबल टाकण्यात यावे. त्यानंतर मिटर बदलीचे कामे करावे. तेही जनतेला विश्वासात घेवुन, ज्या कंपनीला मिटर बदली करण्याचे कंत्राट दिलेले आहे त्यांना कोणत्या आधारावर कंत्राट दिले याची प्रत आणि त्या कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या मजुरांचे आधार कार्डची प्रत व ओळख पत्र त्यांच्या जवळ असायला पाहिजे. हिच अपेक्षा आहे. करिता कन्हान, मौदा व रामटेक सर्व परिसरात जिथे जिथे मिटर बदली करण्याचे कामे सुरू आहे. ते त्वरीत आपल्या प्रभावाने बंद करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला सहकार्य करावे. अन्यथा शिवसेना उ.बा.ठा. रामटेक लोकसभा व्दारे तीव्र आंदोलन करण्यात येईल. तेव्हा उदभवणा-या प्रकारास आपण सर्वस्वी जवाबदार राहणार. अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रामटेक विधानसभा माझी मिडीया प्रमुख हबीब शेख, शिवसै निक बंटी हेटे, नेवालाल पात्रे, जीवन ठवकर, रूपेश सातपुते, शिव स्वामी, संतोष गिरी, सुभाष रोकडे, फजित खंगारे, हाफिज शेख, प्रविण गोडे, अमित गणविर, निशांत जाधव, बाला खंगारे, उमेश भोयर, पवन राऊत, रोहन संतापे, बापु गीरी, राहुल बावणे आदीनी उपस्थित राहुन केली आहे.