सावनेर :- प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या “रमण इफेक्ट” या संशोधनाला मिळालेल्या जागतिक नोबेल पारितोषिकाच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. या प्रसंगाचे औचित्य साधून आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने स्नातक विद्यार्थ्यांकरिता विदर्भ स्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर आणि नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील वनस्पतीशास्त्र विभाग यांचेतर्फे नुकतेच करण्यात आले. स्पर्धेत विविध जिल्ह्यातील जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एस. एफ. एस. महाविद्यालय नागपूर ची विद्यार्थिनी सारा अब्रार शेख, द्वितीय पारितोषिक हिस्लॉप महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थिनी आर्या दिलीप राठी तर तृतीय पारितोषिक भालेराव विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थी प्रीतम विनोद नागतोडे यांस मिळाले. याशिवाय विविध महाविद्यालयातील विद्यार्थी धनश्री धरवाळकर, अथर्व घुटके, भावना गोनेकर, दर्शना भांगे, सुप्रिया भास्कर, स्नेहा बोन्डे, प्रियांशी नंदागवळी यांना प्रोत्साहनपर पारितोषिके जाहीर करण्यात आली. लवकरच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल अशी माहिती स्पर्धेचे संयोजक प्रा. डॉ. विलास डोईफोडे आणि समन्वयक डॉ. अरविंद मुंगोले यांनी दिली. प्रा. चंद्रशेखर पोटोडे, प्रा. प्रवीण दुलारे, प्राचार्य डॉ. पराग निमिशे, प्राचार्य डॉ. डी. एम. गहाणे तसेच नागपूर विद्यापीठ वनस्पतीशास्त्र प्राध्यापक संघटना यांचे सहकार्य लाभले.
विज्ञान दिन निमित्याने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com