– 28 व 29 एप्रिल 2023 उल्हास या वार्षिकोत्सवाचे आयोजन
नागपूर :- अमरावती मार्गावरील सातनवरी येथील मैत्रेय एज्युकेशनल सोसायटी द्वारा संचलित नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट च्या वतीने 28 व 29 एप्रिल 2023 उल्हास या वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटना प्रसंगी स्टॅन्ड अप कॉमेडियन व रील व्हिडिओ या आगळ्या वेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करून सामान्य माणसाच्या घराघरात पोहोचणाऱ्या अशा स्टँड अप कॉमेडीयन नेहा ठोंबरे या सेलेब्रिटी गेस्ट म्हणून आपली हजेरी लावणार आहेत. भाडिप फेम स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे विदर्भाची वऱ्हाडी भाषेचा वापर करून सामान्य गृहिणींची व्यथा मजेशीररित्या पण साध्या व सरळ भाषेमध्ये लोकांपुढे आणतात. सध्या जगामध्ये सुरू असणाऱ्या चालू घटनांना लोकांच्या निर्देशनात आणून लोकाना जागृत करून त्या एक प्रकारे आधुनिक समाजप्रबोधन करायचे काम करीत आहेत. सुरक्षा समिती सारख्या आणि इतरही सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्या भाग घेऊन समाजसुधारकाचे पण काम करीत आहेत. युट्युब, फेसबुक अशा प्रसार माध्यमातून त्या काम करतात त्यांचे एक लाखापेक्षा पण जास्त फॉलोवर्स आहेत. व्हिडिओज वरील या व्यतिरिक्त त्या अभिनय क्षेत्रात पण काम करतात त्यांनी तमिळ या भाषेतील पिक्चर केलेला आहे. नाटक, एकपात्री नाटकातून मजेशीर रित्या लोकांपर्यंत आपले म्हणणे पटवून देणाऱ्या नेहा ठोंबरेनी लोकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहेत.
28 एप्रिल 2023 उल्हास 2023 वार्षिक उत्सवामध्ये उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.संजय दुधे आजी कुलगुरू आरटीएमयू नागपूर, सिद्धार्थ गायकवाड विभागीय आयुक्त सामाजिक न्याय विभाग नागपूर, संस्थेचे अध्यक्ष इंजि. मदन माटे व सचिव अजय वाघमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय केलो उपप्राचार्य डॉ.मुरलीधर रहांगडले समन्वयस्कर राहुल ब्राह्मणे आयुषी लाडे मॉडेल व फॅशन डिझायनर (इग्नाइट अकॅडमी) अकॅडमी, संगीतकार राहुल कराडकर मुंबई, कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक संदीप ठाकरे व इतर उपस्थित राहतील.