नवी मुंबई :- देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जिर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आज कोंकण भवन येथे साजरी करण्यात आली.
यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखंल, प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक ठिकाणी पाण्याचे नियोजन केले तसेच त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.