पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दिप्ती प्रशांत महल्ले यांना प्रदान करण्यात आला.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दिनांक 31 मे रोजी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त तसेच नेहरु युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवक दिप्ती प्रशांत महल्ले व दिपाली पाटील यांना गट ग्रामपंचायत गारला – सावळी च्या सरपंच आरती शहाणे व उपसरपंच राहुल बोढारे यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ देण्यात आला. यामध्ये त्यांना सन्मान चिन्ह,शाल-श्रीफळ तसेच पाचशे रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी ग्रा. प सदस्य प्रशांत महल्ले अंगणवाडी सेविका संगीता नागपुरे, आशा वर्कर मनीषा सावरकर,अमर इंगोले ,सुनील उकुद्दे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

किनारी रस्ता प्रकल्प मुंबईकरांसाठी दिलासा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Wed May 31 , 2023
‘मावळा’चे काम फत्ते…!आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू..! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभियंते, कामगारांचे अभिनंदन..!  मुंबई :- मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्वपूर्ण अशी भर पडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com