राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

नवी दिल्ली :- प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज उभय महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक तंबाकू निषेध दिवस

Fri May 31 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण कार्यक्रम आणि सिगारेट व अन्य उत्पादन प्रतिबंध कायदा 2003 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज 31 मे ला कामठी नगर परिषद च्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांच्या मुख्य उपस्थितीत जागतिक तंबाकू निषेध दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित कर्मचारी आशा वर्करगण यांनी तंबाकुचे दुष्परिनाम संबंधी वैज्ञानिक संशोधन माहिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com