नागपूर :- पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथील फिर्यादी / पिडीता वय १४ वर्ष यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथे अप. १३६ / २१ कलम ३५४, ३५४ (अ) भादवि सहकलम ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील अल्पवयीन फिर्यादी / पिडीता व आरोपी नामे सागर सीताराम उईके, वय २० वर्ष रा. बिडगणेशपुर हे एकाच गावात राहत असुन एकमेकांचे घराशेजारी राहतात. यातील पिडीता ही घरी एकटी असता आरोपीने फिर्यादी / पिडीतेला बोलावुन तुझ्या घरच्या कोंबड्यांनी माझे अंगणात घाण केली आहे ती आधी साफ करूण दे असे म्हटले असता फिर्यादी / पिडीता ही आरोपीच्या घरासमोरील घाण साफ करूण घरी परत जात होती. तेव्हा आरोपीने पिडीतेला आवाज देवुण थांबवुन पिडीतेचा हात पकडला व जबरदस्तीने घरामध्ये घेवुन जात होता. फिर्यादीने आरडाओरड केली असता समोरच्या घरी राहणारा मुलगा तेथे आल्याने आरोपीने पिडीत / फिर्यादीचा हात सोडला. सदर प्रकरणाचे तपास पोलीस उपनिरीक्षक आरती उपडे यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. एक्स्ट्रा डी. जे. पांडे कोर्टामध्ये सादर केले. आज दिनाक ०४/०८/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश मा. एक्स्ट्रा डी. जे. पांडे यांनी वरील नमुद आरोपीस कलम ८ पोक्सो अन्वये ०३ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- दंड. दंड न भरल्यास ०३ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने ए. पी. पी. परसोड़कर यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणून सहायक फौजदार अनिल व्यवहारे पो.स्टे. एमआयडीसी बोरी यांनी मदत केली आहे.
विनयभंग करणाऱ्या आरोपीला कोर्टातून शिक्षा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com