जबरी संभोग करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

नागपूर :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. देवलापार येथे अप. क्र. ८१/२०१८ कलम ३७६ (ड) भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.

सदर गुन्हयात दि. २२/०३/२०१८ मे २०.०० वा. ते दि. २३/०३/२०१८ चे ००.३० वा. दरम्यान पिडीता ही गावी बाहेर संडासला गेली असता आरोपी नामे अजय शिव ताकोत, वय २७ वर्ष, रा. पवनी ता. रामटेक जि. नागपूर मागुन आला व त्याने (फिर्यादी) पिडीतेचे तोंड दाबुन खेचत बेशरमचे झुडुपात नेले, तिचेशी जबरी संभोग केला.

सदर प्रकरणाचे तपास पोलीस अधिकारी सुरेश म‌ट्टामी यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. डी. जे-०८, एच. सी. शेंडे कोर्टामध्ये सादर केले. आज दिनाक २८/०६/२०२४ रोजी मा. डी. जे-०८, एच. सी. शेंडे यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३७६ भादवि मध्ये ०७ वर्ष सश्रम कारावास व १०,०००/- रु. दंड. दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

सरकारचे वतीने एपीपी रश्मी खापर्डे यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन पोहवा इमरान शेख यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ व पान मसाला पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर बुट्टीबोरी पोलीसांनी कारवाई करून एकूण १.२९.०२७८४/- रू चा मुद्देमाल जप्त

Mon Jul 1 , 2024
बुट्टीबोरी :- दिनांक २७/०६/२०२४ चे रात्री पोउपनि मुन्नसिंग ठाकुर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथील स्टाफ वाय पॉईंट येथे पेट्रोलिंग करीत असतांना स्टाफ यांना दुरूनच लाईटाचा उजेड दिसला, पोस्टे बुट्टीबोरी स्टाफ रोडचे कडेला गाडी थांबवुन ट्रक क्र. एब आर- ५५ ए.एल. ३५५२ च्या चालकाला नाव गाव विचारले असता त्याने अपले नाव एजाज वल्द समिर अहमद वय २६ वर्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com