पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी ९७ व्या साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडीने सुरुवात

– शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पुजनाने झाला दिंडीस प्रारंभ

– चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, फुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले स्वागत

जळगाव :- शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री संत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद्‌‍ भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता.

सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याच्यासह सुमारे 4 हजार सारस्वतांच्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते. अमळनेरकरांकडून दिंडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता.

ग्रंथदिंडी सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई चौक, सुभाष चौक, स्टेट बॅंक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या मार्गाने येत असताना चौकात विविध ठिकाणी रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले. सकाळी 8 वाजता सुरू झालेली दिंडी संमेलन स्थळी दहा वाजता पोहचली. मंत्री महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष जैन, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर यांनीही या दिंडीत सहभाग घेत पायी चालले, तर मंत्री महाजन यांनी दिंडी मार्गावरील विविध थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

या संस्थाचा होता सहभाग

केशव शंखनाद पथक, पुणे, खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्रचार्य, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, एनएसएस, एनसीसी, वसतिगृह विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ढोल ताशा पथक, गंगाराम सखाराम शाळा अमळनेर, द्रो. रा. कन्या शाळा, अमळनेर, प्रताप हायस्कूल, अमळनेर, मंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखी, स्वामी विवेकानंद शाळा, बंजारा समाज पारंपरिक नृत्य, चाळीसगाव, धनगर समाज पारंपरिक नृत्य, वासुदेव पथक, जामनेर, नवलभाऊ प्रतिष्ठान आर्मी स्कूल, सावित्रीबाई फुले शाळा, अमळनेर, साने गुरुजी शाळा, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, मराठी वाड:मय मंडळाचे सर्व समिती सदस्य, वारकरी पाठशाळा अमळनेर, नंदगाव माध्यमिक विद्यालय, भरवस माध्यमिक विद्यालय, महसूल व पोलीस प्रशासन, फार्मसी महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, एमएसडब्ल्यू कॉलेज, टाकरखेडा माध्यमिक हायस्कूल, उदय माध्यमिक विद्यालय, चौबारी माध्यमिक विद्यालय, रणाईचा माध्यमिक आश्रमशाळा, हातेड माध्यमिक शाळा, कोळपिंप्री माध्यमिक विद्यालय, शारदा माध्यमिक शाळा कळमसरे, पी. एन. मुंदडा माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, गडखांब माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ग्रंथदिंडी सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

साने गुरुजींच्या स्मारकास निधी उपलब्ध करून देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Sat Feb 3 , 2024
– गरिबांच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळणे मुलभूत अधिकार – साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे – उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य – उद्घाटक सुमित्रा महाजन – ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अमळनेर येथे उद्घाटन जळगाव :- राज्यात अध्यात्म, ज्ञान, तत्वज्ञान रुजविणारे अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर साहित्य, कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रातही शहरांचा विकास झाला पाहिजे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com