नरहरी मोटघरे यांचे असा मी जगलो पुस्तकाचे प्रकाशन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

सेवानिवृत्ती निमित्त वीस हजार रुपये तथागत बुद्ध विहार ला दान. 

नागपूर :- समता सैनिक नरहरी मोटघरे यांनी आपल्या आयुष्याची सामाजिक बांधिलकी जपली. तरुण वयात समता सैनिक झाले. त्याच बरोबर आपल्या कुटुंबासह पूर्व नागपूर आणि नागपूर ग्रामीण भागात समता सैनिक दला च्या शाखा निर्माण केल्या त्यांचे असीम त्यागाचे जिवन सर्वाना प्रेरणादायक आहे. आपल्या पुढे अनेक समस्या आहेत. त्या समस्येवर उपाय म्हणून बुके गुलदस्ता, भेट वस्तू न देता सर्वानी रोख रक्कम द्यावी ती सामाजिक बांधिलकी ची रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करता येईल असे भदंत नाग दिपंकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. प्रमुख अतिथी डी.एफ.कोचे,राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल , राजकुमार वंजारी,प्रदीप डोंगरे, विलास गजभिये, अमर दीपंकर,गजेंद्र गजभिये, सुरेश मेश्राम, प्रमोद खांडेकर,युवराज बडगे, संघप्रिय नाग, प्रमुख उपस्थितीत होते “असा मी जगलो ” हे नरहरी मोटघरे यांच्या जीवनावर आधारित आत्मवृत्तपर पुस्तक विमोचन करण्यात आले. समतेच्या लढ्यात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन डि एफ कोचे यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पैकी नरहरी मोटघरे हे एक प्रामाणिक नाव आहे असे विलास गजभिये यांनी सांगितले. या प्रसंगी अनेकांनी नरहरी मोटघरे यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.

नागपूर महानगरपालिकेत कार्यरत कर्मचारी तसेच समता सैनिक दल भांडेवाडी प्रमुख नरहरी विश्वनाथ मोटघरे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम व पुस्तक विमोचन कार्यक्रम नुकताच भांडेवाडी येथील दत्तकृपा हॉल येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नरहरी मोटघरे व त्यांच्या सविज्ञ पत्नी हिराबाई मोटघरे या दोघांनी आपल्या निवृत्तीच्या रकमेतून वीस हजार रुपयाची रक्कम तथागत बुद्ध विहारास दान देण्याची घोषणा केली .

याप्रसंगी भांडेवाडी येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती दिसून आली,ज्यामध्ये प्रामुख्याने प्रवीण काकडे ,एजाज भाई मित्र परिवार , अचल पाटील, शैलेश फुलझेले,राजू राऊत,अंकुश हूमने, तसेच त्यांच्यासोबत कार्यरत त्यांचे सहकारी कर्मचारी संघरत्न मेश्राम, गणेश मेश्राम व इतर अनेक सहकारी उपस्थित होते. संचालन प्रदीप महेशकर पृथ्वी मोटघरे व ब्रिज मोटघरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Thu Jun 1 , 2023
नागपूर :- थोर समाजसुधारक, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नागपूर महानगरपालिकेच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.            अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ. रविन्द्र भेलावे, विशेष कार्यसन अधिकारी श्रीकांत वैद्य, यांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे, विनोद डोंगरे, अनिल चव्हाण, यांच्यासह मनपाचे कर्मचारी उपस्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com