संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहरातील नागरिक आणि शासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी व नागरी समस्या थेट निवारण करून तक्रारींचे निवारण जलद गतीने करण्यासाठी आज 9 मार्च ला कामठी येथील संघ मैदानात राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.या जनसंवाद सभेत 500 च्या वर तक्रारी अर्जाचा त्वरित निपटारा करण्यात आला..या जनसंवाद सभेत. अनेक नागरिक आपापल्या मागण्या व निवेदन घेऊन मोठ्या आशेने आले होते. त्या सर्वांचे समाधान करण्यात आले.. हा जनसंवाद माझ्या मायबाप जनतेचा असल्यामुळे त्यांची सेवा हेच माझे परमकर्तव्य आहे. व जनसेवा हाच एकमेव ध्यास असल्याचे मौलिक मत राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
या जनसंवाद सभेत शहरातील अतिक्रमण, पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक, अध्यात्मिक, धार्मिक अशा विविध विषयांच्या निगडित निवेदने नागरिक घेऊन आले होते. नागरिकांनी आणलेल्या निवेदनांची तत्काळ दखल घेत त्यासंबंधी कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या .तसेच, नागरिकांच्या अनेक वैयक्तिक समस्यांबाबत देखील निवेदने स्वीकारली व त्या संदर्भात संबंधित व्यक्तीशी चर्चा केली. तसेच नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टेवाटप देखील केले.
अतिशय समाधानकारक व उत्साही वातावरणात आजचा जनसंवाद संपन्न झाला. यावेळी, माजी आमदार टेकचंद सावरकर,माजी जी प सदस्य अनिल निधान, रिंकेश चवरे, अजय अग्रवाल, उमेश रडके, राज हाडोती, संजय कनौजीया, कपिल गायधने, वैशाली मानवटकर, यांच्यासोबत इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.