अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – तिरोडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक योगेश पारधी हे दिनांक 31 ऑगस्ट सेवानिवृत्त होत आहेत.
त्यानिमित्ताने तिरोडा तालुका पोलीस पाटील संघटना च्या वतीने झरारिया सभागृह तिरोडा येथे जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित केले. सदर कार्यक्रमामध्ये श्री विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, यांनी प्रमोद मडामे, उप विभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा, तिरोडा शहर आणि तालुक्यातील पत्रकार बंधू, सर्व पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समिती, मुस्लिम कमेटीचे पदाधिकारी, श्री गुरुनानक क्रीडा मंडळ, विश्ववंहिंदू परिषद, बजरंग दल, तिरोडा शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळ, पोलीस स्टेशन तिरोडा येथील सपोनि हनवते, जोगदंड, सर्व पोलीस अंमलदार या सर्वांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांचा जाहीर सत्कार करण्यात आले. याप्रसंगी योगेश पारधी यांची मातोश्री कौतिकाबाई लक्ष्मन पारधी ह्या आवर्जून उपस्थितीत राहिल्यात. या प्रसंगी विश्व पानसरे पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी पो नि योगेश पारधी यांनी केलेल्या जागृती प्रकरण, चुरडी तिहेरी हत्याकांड व आत्महत्या प्रकरण, अवैध व्यवसाया विरुद्ध केलेली धडक कार्यवाही, कोविड -19, पूर परिस्थिती हाताळणे असे अनेक अतिशय उत्कृष्ट उल्लेखनीय कार्यवाही करून नागरिका मध्ये ठसा निर्माण करून पोलीस बद्दल विश्वास निर्माण केल्याबद्दल प्रसंशा केलेली आहे.