दुधमाळा काकडेली येथे सखी वन स्टॉप तर्फे जनजागृती कार्यक्रम संपन्न

गडचिरोली : दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोज गुरुवारला उपकेंद्र दुधमाळा अंतर्गत काकडेली येथे सखी वन स्टॉप सेंटर गडचिरोली तर्फे जनजागृती कार्यकम घेण्यात आले.

जनजागृती कार्यक्रमात उपस्थीत मान्यावर डॉ. मौशन्ती नंदेश्वर व जिल्हा परिषद मुख्याध्यापिका मंजुशा पोरड्डीवार उपस्थीत होते. तसेच मार्गदर्शक म्हणून प्रणाली बळवंत सुर्वे व लोमेश जिवनदास गेडाम यांनी महिला व बालकाना मार्गदर्शन केले.

केंद्र शासन पुरस्कृत महिला व बाल विकास अंतर्गत येणारी सखी – वन स्टॉप सेंटर ही एक पिडीत महिलांना व मुलीना आधार व एका छताखाली अनेक सेवा याप्रमाणे पोलीस सेवा, कायदेशिर मदत व समुपदेशक, आरोग्य सेवा, निवासी सुविधा, मनोरंजन सेवा कायदेविषयक मार्गदर्शन केले जातात.

मार्गदर्शन करतांना वन स्टॉन सेंटर बद्दल माहिती व महिलांवर होणाऱ्या अत्याचार कशामुळे होतात हे सांगण्यात आले व वन स्टॉप सेंटर व्दारा पुरविण्यात येणाऱ्या सेवा तसेच अडचणीत सापडलेल्या तसचे कौटुंबिक संघर्षातील पिडीत महिलांना व त्याच्या बालकांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय मदत कायदेशिर समुपदेशन तसेच हेल्पलाइन क्रमांक 181, 112, 1098, 1091, 155209 या व्दारे महिलांना मार्गदर्शन व मदत करण्यात येते.

जनजागृती कार्यक्रमाची संगता म्हणून सिस्टर सिडाम व सिस्टर पंचभाई यांनी आभार प्रदर्शन केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक यांनी सहाकर्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज खापरी मेट्रो स्टेशन पर साहित्य वारी, अभिव्यक्ती व मेट्रो का संयुक्त मराठी गौरव कार्यक्रम

Wed Mar 1 , 2023
नागपुर: मराठी भाषा गौरव दिवस के अवसर पर महा मेट्रो नागपुर और अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था, नागपुर के सहयोग से ‘माजी भरजारी मराठी’ नामक एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया है. यह कार्यक्रम खापरी मेट्रो स्टेशन पर १ मार्च २०२३ को शाम 5 बजे आयोजित किया गया है। इस कार्यक्रम में अभिव्यक्ति समाज के सदस्य नाटक, कहानी, कविता और […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com