‘पौर्णिमा दिवस” निमित्त नरेंद्र नगर परिसरात जनजागृती

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी महापौर व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत मंगळवारी (ता.२३) नरेंद्र नगर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली.

या अभियानाला नरेंद्र नगर चौक परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.

याप्रसंगी ग्रीन व्हिजीलचे सर्वश्री कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे, तुषार देशमुख, पार्थ जुमडे, काजल पिल्लई आदींनी जनजागृती केली. याप्रसंगी मनपाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, दिलीप वंजारी, स्थानिक रहिवासी शर्मिला बरगी, फुलदास पाटील आदींची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘फिरता दवाखाना’मुळे शेवटच्या व्यक्तीला आरोग्य सेवा मिळणार

Thu Jul 25 , 2024
– भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण नागपूर :- समाजातील शेवटच्या व्यक्तीला उत्तमोत्तम आरोग्य सुविधा मिळावी, हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनद्वारा संचालित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरने पुढाकार घेतला आहे. सेंटरद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘फिरता दवाखाना’मुळे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचेल, असा विश्वास जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com