पौर्णिमा दिवस’ निमित्त पंचशील चौकात जनजागृती

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी महापौर व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत बुधवारी (ता.२१) रात्री पंचशील चौक परिसरात जनजागृती करण्यात आली.

या अभियानाला पंचशील चौक परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.

याप्रसंगी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे, प्रिया यादव, पार्थ जुमडे, पिनकी बनिक आदींनी जनजागृती केली. यावेळी भोलानाथ सहारे, शर्मीला बेरगी, प्रणिता लोखंडे, मनोज, भालेराव आदींची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

IAS, IPS and Rameshwar Naik! 

Fri Aug 23 , 2024
Congratulations to Iqbal Singh Chahal who was earlier working as ACS to Chief Minister Eknath Shinde, is appointed as Additional Chief Secretary- Home today. As far as the rumour market goes about Chief Secretary Sujata Saunik going to the election commission, let me clear it for once and all–she is NOT going anywhere. She will continue to be the Chief […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!