तळोजा पोलीस ठाण्यात जप्त वाहनांचा 29 नोव्हेंबर रोजी जाहीर लिलाव

नवी मुंबई :- नवी मुंबई येथील तळोजा पोलीस ठाण्यात विविध गुन्हयात जप्त असलेल्या वाहनांचा लिलाव दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी तळोजा पोलीस ठाणे आवारात करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रविण भगत यांनी दिली.

तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हयात प्राप्त झालेली 05 दुचाकी आणि 01 चारचाकी वाहने अशी एकूण 06 बेवारस वाहने तळोजा पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र करुन ठेवण्यात आली आहेत. सत्र न्यायलयाच्या परवानगीने दि.29 नोव्हेंबर रोजी या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. जाहिर लिलावतील वाहने घेण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी या वाहनांबाबत अधिक माहितीसाठी तळोजा पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक 022-27412333/ 9082125141/9870301090 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या लिलावात जास्तीत जास्त स्क्रॅप खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी तसेच नागरिकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन तळोजा पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महायुती मजबूत आणि अभेद्य; शिंदेच्या भूमिकेचे स्वागत

Wed Nov 27 , 2024
· चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन मुंबई :- महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मजबूत आणि अभेद्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली, ती राज्याच्या चौदा कोटी जनतेसाठी एक मोठी भूमिका असून आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व जो निर्णय करेल तो सर्वांनाच मान्य असेल, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com