यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत मॉडेल करीअर सेंटर व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडाच्या संयुक्त विद्यमाने दि.9 ऑगस्ट रोजी सुराणा भवन पांढरकवडा येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजता मेळाव्याचे उद्घाटन होईल. सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांमध्ये सेल्स एक्झिकेटीव्ह ते अँप्रेंटिशिप ट्रेनी यासारख्या विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांकरीता शैक्षणिक अर्हता वर्ग 10 वी, 12 वी पास ते पदवीधर तसेच आयटीआय डिप्लोमा अशी आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.