नागपुर – मोटार परिवहन विभाग नागपूर ग्रामीण, पोस्टे कपिल नगर नागपूर षहर येथे दि. 17.8.2022 चे 07.30 ते 07.45 वा. सुमारास मोटार वाहन चालक ग्रेड पोउपनि साहेबराव बहाळे नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलीस हे मोटार परिवहन विभाग नागपूर ग्रामीण येथील वॉशिंग रैम्प वर इलेक्ट्रीक मोटार लाऊन त्यांच्या ताब्यात असलेले शासकीय वाहण धुण्याकरिता गेले असता त्यांना पाण्याचे इलेक्ट्रिक मोटार चा झटका(शॉक) लागून खाली पडले असता त्यांना बेशुद्ध अवस्थेत एलेक्सीस हॉस्पीटल नागपूर येथे फिर्यादी व इतर सह कर्मचारी यांचे मदतीने घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण येथे शासकीय वसाहतीमध्ये त्यांना अंतिम सलामी देण्यात आली. त्यांचे पार्थिव शरीर त्यांचे मुळ गावी कारंजा लाड जि. वाषिम येथे अंतविधी संस्कार करिता नेण्यात आले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी नामे- चालक पोलीस हवालदार गिरीश नामदेव कापडे बक्कल मोटार परिवहन विभाग नागपूर ग्रामीण यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. कपिल नगर नागपूर शहर येथे मर्ग क्र. 45.2022 कलम 174 जाफौ. कायद्यान्वये मर्ग नोंद केलेला असून पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील ग्रेड पोउपनि साहेबराव बहाळे यांचे इनेक्ट्रीक करंट लागून मृत्यु
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com