कन्हान :- मणिपूरमधील अमानवीय घटनेच्या विरोधात व निषेधार्थ कन्हान महिला काँग्रेस अध्यक्ष रिता बर्वे यांच्या नेतृत्वात तारसा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यन्त हातावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढण्यात आला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोमबती लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
मणिपूरमध्ये दोन स्त्रियांना निर्वस्त्र करून धिंड काढून त्यांच्या देहाची विटंबना केली गेली, सामुदायिक बलात्कार केला गेला. मानवतेला काळीमा फासणारी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारी ही घटना उघड झाली असली तरीही आपल्या देशातले मख्ख मुर्दाड आपल्याच तालात दंग आहेत हे चित्र विलक्षण संतापजनक आणि घृणास्पद आहे.
मणिपूरमधील घटना केवळ एक गुन्हा नसून घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांची क्रुरता समोर आहे. जवळपास तीन महिन्याचा कालावधी होऊनही केंद्र आणि राज्य सरकार परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकले नाहीत. हिसाचारात आतापर्यंत 140 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करा. अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे
कन्हान महिला काँग्रेस अध्यक्ष रिता बर्वे यांच्या नेतृत्वातील मूकमोर्च्यात नगरसेविका रेखा टोहने , नगरसेविका गुफा तिडके ,नगरसेविका पुष्पा कावडकर, मीना वाटकर, सविता बावणे, मीना ठाकूर, माया वाघमारे, शैला राऊत, मंदा बागडे, पुष्पां भेलावे, सुनंदा कठाने, वंदना बागडे, भूमिका बोरकर, झुही बागडे, शीतल पाटील, दिपा शेंडे, कल्पना ठाकूर, राधिका खडसे, कांचन धावडे, अनिता मेश्राम, मालती विश्वकर्मा , मालती महले, स्नेहा पाली, सुनीता डेहरिया , शिला मेश्राम , कन्हान युवक कॉंग्रेस अध्यक्ष आकीब सिद्धीकी , गौतम नितनवरे, शरद वाटकर, अजय कापसीकर, आनंद चकोले, प्रदीप बावणे, कुणाल खडसे, निखिल तांडेकर , शेखर बोरकर, महेश धोंगडे, ऋषीकेश हावरे आदि सहभागी होते