खासदार धीरज साहू विरोधात भाजप महिला मोर्चाचे नागपुरात निषेध आंदोलन

– महिला आक्रमक : काँग्रेसविरोधात घोषणा

नागपूर :- काँग्रेसचे लाचखोर खासदार धीरज शाहू ह्याच्या घरी धाडीत जवळपास ३०० करोडची बेनामी संपत्ती आढळून आली, अशा भ्रष्ट लोकप्रतिनिधींचा निषेध आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आला. महिला मोर्चा महानगर अध्यक्ष प्रगती पाटील यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.

पश्चिम नागपुरात गित्तिखादान चौक येथे सोमवारी सकाळी भाजप महिला मोर्चाच्या शेकडो महिला एकत्रित झाल्या. काँग्रेस आणि त्याच पक्षाचे लाचखोर खासदार धीरज शाहू यांच्याविरोधात घोषणा देऊ लागल्या. एकीकडे काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराचे आरोप भाजपवर करत आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या खासदाराला कोट्यवधीची संपत्ती आढळत आहे. जनतेचा पैसा लुटण्याचा हा प्रकार असून अशा लोकप्रतिनिधींना निलंबित करण्यात यावे आणि यापुढे निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी महिला मोर्चा अध्यक्ष प्रगती पाटील यांनी केली.

शहरात इतर विधानसभा मतदार संघातील महिलांनी आंदोलन केले. यामध्ये प्रगती पाटील यांच्या नेतृत्त्वात वैशाली चोपडे, जयश्री राठोड, शशीकला वडे, शिल्पा धोटे,रेखा दैने, कल्पना पाजारे, कविता सरदार, राखी शिगारे,रजनी पाडे, संगीता पाटील,माया उईके,वैशाली फरकांडे ,राणी रेड्डी आदी सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल भाजपा प्रदेश कार्यालयात आनंदोत्सव

Mon Dec 11 , 2023
मुंबई :- जम्मू काश्मीरसाठीचे कलम ३७० हटवण्याचा मोदी सरकारचा निर्णय वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ.संजय पांडेय, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी, ”जहां बलिदान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com