नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या सरकार मार्फत सर्वांसाठी विविध योजना राबविली जातात, MSME लघु उद्योजकांना बैंक द्वारे कर्ज दिला जातो. या संदर्भात विदर्भ हैचरी असोसिएशनच्या सदस्यांना बैंक अधिकारीं कडुन मिळालेल्या दुर्व्यव्हारची व असभ्य वागणुकीचे तक्रारी प्राप्त झाल्यावर या संदर्भात केंद्रिय वित्त राज्यमंत्री डाँ. भागवत कराड यांच्या सोबत विदर्भ हैचरी असोसिएशन चे अध्यक्ष नितीन पानतावणे यांची बैठक नई दिल्ली येथे जुलै महिन्यात झाली. या सोबत यांनाही पंजाब नेशनल बैंक मानकापुर (नागपुर) येथिल बैंक शाखा प्रबंधक सी.पी करवाडे व बैंक अधिकारी राहुल गि-हे कडुन हैचरी उद्योजकांना अरेरावी भाषा वापरुन मानसिक व शाब्दिक त्रास देण्यात आले, अश्या बेजवाबदार बैंक अधिकारींवर कार्यवाही करुन त्यांना तात्काळ नौकरीतुन बर्खास्त करण्यात यावे, बैंक मैनेजरांना व कर्मचारींना नागरिकांसोबत सन्मानाने व्यवहार करण्याची ताकिद देण्यात यावी अश्या प्रकारचे तक्रार निवेदन बैंकेचे चेयरमन अतुल गोयल यांना ही देण्यात आले होते.
तरिही बैंकेचे वरिष्ठ अधिकारी बैंक शाखा प्रबंधक सी.पी करवाडे व बैंक अधिकारी राहुल गि-हे यांच्यावर कार्यवाही न करता पाठिशी घालत आहे हे विदर्भ हैचरी असोसिएशनच्या निर्दशात दिसुन आले. सदर अधिकारी स्थानिक मराठी तरुण उद्योजकांना उडवाउडविची कारणे सांगुन दिशाभुल करतात, व काही उद्योजकांना अश्या ढिसाढ बैंक अधिकारी कडुन अपमानास्पद वागणुक मिळालेली आहे. बैंकाच्या दुर्व्यव्हारा व गैरव्यव्हारा विरोधात संताप व्यक्त करूण पंजाब नेशनल बैंक किंग्जवे नागपुर चे मुख्य क्षेत्रिय प्रबंघक चतुर्वेदी यांना गुरूवारी विदर्भ हैचरी असोसिएशन प्रतिनिधी मंडला तर्फे निवेदन देण्यात आले. विदर्भ हैचरी असोसिएशनचे सदस्य राहुल भोरकर (वाकी), विनोद मोहोड (हिंगणा), रविशंकर रंगारी (टेकेपार भंडारा), अभिजित ठाकुर (कलमेश्वर ब्राम्हणवाडा) सोबत नागपुर एक्शन ग्रुपचे अध्यक्ष विश्वजीत सिंह उपस्थित होते.