संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- यवतमाळ येथील आझाद मैदान परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना अज्ञात समाजकन्टका कडून करण्यात आली असून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर अज्ञाताने काळी शाई टाकून विटंबना केल्याने असा प्रकार घडणे ही एक चिंतेची बाब आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून अश्या घटना घडल्यामुळे एकोपा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.तेव्हा या घटनेला जवाबदार असणाऱ्या समाज कंटकाला तात्काळ पकडावे व कायदेशीर कारवाही करावी तसेच या घटनेचा कामठी येथील प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे.