नागपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर यांचेकडून घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 16 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 6 ऑगस्ट 2024 रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीसाठी मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या परिसरात व त्यासभोवतालच्या 100 मीटर परिसरात परीक्षेशी संबंधित असलेल्या शिक्षक, अधिकारी, कर्मचारी इत्यादी वगळून इतर कोणत्याही खाजगी व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यासाठी आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या परिसरात दोन किंवा देान पेक्षा जास्त व्यक्तीं एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश संबंधित केंद्रावर परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी यांना लागू होणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, बुथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स सेंटर्स, ई-मेल इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, मोबाईल, प्रसार माध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावीत.
परीक्षा केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रांझिस्टर, रेडिओ, कॅलक्यूलेटर, लॅपटॉप व तत्सम इतर साधने परीक्षा केंद्रावर जवळ बाळगण्यास व परिसरातील 100 मीटर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास मनाई करण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लघंन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.