विसर्जनानंतर पाण्यात तरंगणाऱ्या मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदी

मुंबई :-  नवरात्र उत्सवाच्या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात वाहून न गेलेल्या देवी मूर्तींचे छायाचित्र काढून त्याचा प्रसार होतो. यामुळे जनमानसाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशा मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदीचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

बृहन्मुंबईमध्ये होणाऱ्या देवी मूर्तीच्या विसर्जनानंतर अर्धवट विरघळलेल्या मूर्ती भरतीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून येतात किंवा तरंगतात. या मूर्ती महानगरपालिकेचे कर्मचारी गोळा करतात. दि. 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विसर्जनाच्या प्रसंगाचे छायाचित्र काढणे, चलचित्र काढणे, प्रकाशित करणे आणि प्रसारित करण्यास बंदीचे आदेश आहेत. कलम 144 अन्वये विशेष अधिकारान्वये पोलीस उप आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. नमुद कालावधीनंतर आवश्यक असल्यास यासंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृषिमाल काढणीत्तोर व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित

Sat Oct 1 , 2022
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान नागपूर :- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फलोत्पादन पिकांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके व त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकासाठी शेतक-यांनी २०२२-२३ या वर्षासाठी प्रकल्पाच्या बांधकामासाठी महाडीबीटी पोर्टलवर (mahadbtmahait.gov.in) अर्ज करावेत किंवा कृषि कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com