एकूण 600 किलो चे प्लास्टिक जप्त.
वाडी नगरपरिषदेची कारवाई : 10हजार रु. चा दंड वसूल.
वाडी :- वाडी परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक दुकानदार, चिकन मटण व्यावसायिक, ट्रान्सपोर्ट गोडावून यांना प्रतिबंधित प्लास्टिक वापरावर वाडी नगर परिषदे तर्फे वारंवार सूचना व कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच वाडी येथील आरको गोडावूनची तपासणी केली असता 600 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून 10हजार रु. दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे इतर व्यावसायिक दुकानदारामध्ये खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहिती नुसार गेल्या अनेक दिवसांपासून वाडी परिसरात असलेल्या छोटे मोठे दुकानदार, ट्रान्सस्पोर्ट, गोडावुन व नागरिकांना नगर परिषदेतर्फे प्रतिबंधित प्लास्टिक निर्बंधाबद्दल कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज दि.21ऑक्टो.2022 ला नप. मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाडी परिसरात “प्लास्टिक निर्मूलन पथका”ची तपासणी सुरू असतानाच नगर परिषदच्या स्वच्छता अभियंता व पथक प्रमुख सुषमा भालेकर, शहर समन्वयक पिंकेश चकोले व भिमराव जासुतकर यांनी खडगाव रोड वाडी येथील आरको गोडाऊन येथे तपासणी केली असता प्रतिबंधित प्लास्टिक साठा असल्याचे निदर्शनास आले. सदर घटनेची माहिती नगर परिषद वाडी मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांना देण्यात आली. घटनास्थळी मुख्याधिकारी समक्ष न.प. वाडी प्लास्टिक निर्मूलन पथकाने प्लास्टिक जप्तीची कार्यवाही पूर्ण केली. सदर गोडाऊन धारकाचा दुसरा गुन्हा असल्याने नगर परिषद प्लास्टिक निर्मूलन पथक द्वारे रु. १०,०००/- चा दंड वसूल करण्यात आला व ६००किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. सदर कार्यवाहिला मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख, स्वच्छता अभियंता व पथकप्रमुख सुषमा भालेकर,लेखाधिकारी चेतन तुरणकर,स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे, शहर समन्वयक पिंकेश चकोले,योगेश जहागीरदार,भिमराव जासुतकर,विद्युत अभियंता नंदन गेडाम,आनंद शेंडे उपस्थित होते.