प्रगतीशील शेतकरी अजय लाडसे यांनी घेतले एकरी २३ क्विंटल गव्हाचे उत्पादन

 तालुका कृषी कार्यालयाचे मार्गदर्शन
 उत्पादन होत नसल्याची ओरड असताना भरघोस उत्पादन 
काटोल प्रतिनिधी :- शहरातील नामांकित शेतकरी अजय लाडसे यांनी त्यांच्या शेतात गव्हाचे महाबीजचे बायोफोर्टिफाईड सरदार या बियाण्यांची जवळपास २.२५ एकरात पेरणी केली होती  पेरणी करताना बिजप्रक्रिया लिक्विड कंसोरशीया, ट्रायकोडर्मा घालण्यात आला अन्नद्रव्ये व्यवस्थापन विद्यापीठाच्या शिफारसीनुसार पेरणी करण्यात आली यात नुकतीच हार्वेस्टरच्या माध्यमातून काढणी केली असता त्यांना सव्वा दोन एकराच्या प्लाॅट मध्ये एकुण ५५. ३० क्विंटल गव्हाचे उत्पादन झाल्याची माहिती दस्तुरखुद्द अजय लाडसे यांनी दिली.
                                        आज होत असलेली शेतकऱ्यांची परवड गहु कापणी करीता एका मजुराला आठ पायल्या गहू द्यावे लागतात त्यानंतर मळणीयंत्रावरुन गहू काढताना होत असलेला त्रास यात शेतकरी हवालदिल झालेला दिसुन येतो अशात परंपरेनुसार होत असलेला शेतीव्यवसाय हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे त्यामुळे परंपरागत शेतीव्यवसाय टाकून आधुनिक शेती करत भरघोस उत्पादन कमी खर्चात घेता येऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रगतीशील शेतकरी अजय लाडसे हे आहेत कारण त्यांनी फक्त शेणखताचा उपयोग करुन पिक घेतले आहे ना कुठले रासायनिक खतांचा वापर केला ना कुठल्या रासायनिक फवारणीचा उपयोग केला त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकरीता हे उत्तम उदाहरण असुन आवश्यक असेल तिथेच रासायनिक खते व फवारणी करावी जेणेकरुन शेतजमीनीचे पोषण होवून जमीनीची पोत सुधारणा होऊ शकेल असा सल्ला तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके व कृषी सहाय्यक जायभाये यांनी दिला आहे तसेच प्रगतीशील शेतकरी अजय लाडसे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की राज्याचे माजी गृहमंत्री व काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार अनिल देशमुख यांच्या प्रयत्नातून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते यात नवनवीन माहिती शेतकऱ्यांना मिळत असते त्यावर मी सखोल अभ्यास करून आज भरघोस उत्पादन घेत असल्याचे त्यांनी सांगितले व शेतकरी बंधुंनी पेरणी करीता चांगल्यात चांगले वाण पाहून पेरणी करावी व रासायनिक खते व फवारणी वर जास्त भर न देता शेणखत सेंद्रिय खत व फवारणीचा उपयोग करावा असे आवाहन याप्रसंगी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष गणेश चन्ने, मुन्ना पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर कोल्हे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण काळाची गरज- मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Mon Mar 28 , 2022
सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटच्या नागपूर येथील कन्व्हेन्शन सेंटर तसेच कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन गडकरींच्या हस्ते संपन्न नागपूर-  व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज असून नागपुरातील  मागास भागातील  गरीब विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण  देऊन सिम्बॉयसिस विद्यापीठाने नागपूरकरांना अनोखी भेट दिली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज केले, पूर्व नागपुरातील वाठोडा येथील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नागपुर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com