भिवापूर :- दिनांक ३०/०६/२०२४ रोजी पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, भिवापूर येथे पाहमी फाटा येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ याने नमुद घटनास्थळी जावुन टिप्पर क्र. एम एच ४०/सी टी २४२४ च्या चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात टिप्पर चालक व आरोपी नामे १) आशिष संजय चवरे, वय २५ वर्ष, रा. सावरगाव ता. भिवापुर, जि. नागपुर हा टिप्परमध्ये अवैधरीत्या रेतीची चोरी करतांना मिळुन आल्याने त्याच्या ताब्यातून टिप्पर क्र. एम एच ४०/सी टी २४२४ किंमती अंदाजे २०,००,०००/- रू. व ०६ ग्रास रेती किंमती अंदाजे ४०,०००/- रू. असा एकुण २०,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे सफौ अशोकसिंह ठाकुर, पो.स्टे भिवापूर यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. भिवापूर येथे चालक १) आशिश संजय चवरे, वय २५ वर्ष, रा. सावरगाव ता. भिवापुर, जि. नागपुर व मालक नामे-२) आकाश काकडे, वय ३२ वर्ष रा. बेसा ता. जि. नागपुर यांचेविरुध्द कलम ३७९, १०९, ३४ भादवि सहकलम ४८ (७), ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६, सहकलम २१, ४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतीबंधक अधिनियम १९८४ कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोहवा किशोर ठाकुर हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.), रमेश भुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा) यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि. जयप्रकाश निर्मल, सफौ अशोकसिंग ठाकुर, पोहवा राकेश त्रिपाठी, किशोर ठाकुर यांनी केली.