सोनेगाव(डिफेन्स):- आयुध निर्माणी अंबाझरी येथील धरमपेठ इंग्रजी माध्यम शाळा व ज्युनिअर कॉलेज, डिफेन्स, नागपूर येथे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी करण्यात आली व याच औचित्याने आंतर शालेय किल्ले बांधणी उपक्रम स्पर्धा बक्षिस वितरण सोहळ्याचे संयुक्त कार्यक्रम संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष अॅड. संजीव देशपांडे, शिवाजी महाराजांचे व सावरकरांचे गाढे अभ्यासक शरदराव पुसदकर, संस्थेचे सहसचिव दिपक दुधाने, शाळा समिती सदस्य सुरेश देव, विनय सालोडकर, वाडी नगरपरिषदचे माजी सभापती केशव बांदरे, प्राचार्य विजय मुंगाटे प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बालक दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन त्यांना मिठाई देण्यात आली.
शाळेतर्फे आंतर शालेय किल्ले बांधणी उपक्रम स्पर्धा घेण्यात आली होती. यात जवाहरलाल नेहरू विद्यालय, राष्ट्रीय हिंदी माध्यमिक विद्यालय, धरमपेठ इंग्रजी माध्यम शाळा व ज्युनिअर कॉलेज, डिफेन्स, जिल्हा परिषद शाळा आदींनी भाग घेऊन किल्ल्यांचे सादरीकरण केले होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून शिवकालीन ऐतिहासिक व काल्पनिक किल्ले बांधणी केली. समूहानुसार मुरूड, जंजिरा, रायगड, मल्हारगड या किल्ल्यांनी प्रथम स्थान पटकावले. परीक्षक म्हणून प्रतिक बांर्दे, सागर कन्हेरे, अखिलेश अय्यर, साई मधू, शुभम बंड आदींनी परीक्षकांची जिम्मेदारी उत्तमरीत्या पार पाडली. उज्वला अहेर, लता सिंग, चैताली दंढारे, रश्मी पाटील, मऊव्हा बसू, नलिनी पाटील, रिना जामठे, निक्की सिंग, वसंत निकम, शिवकुमार दुबे, अमित गायधने, श्रध्दा जिपुरकर, कल्पना बिसेन, वैशाली, ईला राय, मनिषा सातपुते, मयुरी दंदारे, सोनाली मिश्रा, शुरभी पांडे, स्वेता श्रीवास आदी शिक्षकांनी किल्ले बांधणी उपक्रमात श्रम घेतले.
यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकगण उपस्थित होते.