थीम पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधानांचा लाभार्थ्यांशी संवाद

Ø पी.एम. विश्वकर्मा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींचे प्रदर्शन

Ø 21 आणि 22 सप्टेंबर रोजी नागरिकांसाठी प्रदर्शन खुले

वर्धा :- पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या थीम पॅव्हेलियनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींच्या प्रदर्शनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. हे प्रदर्शन नागरिकांसाठी 21 व 22 सप्टेंबर रोजी खुले राहणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने गतवर्षी पी.एम. विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली.

या योजनेचा वर्षपुर्ती सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या आकर्षक कलाकृतींची पाहणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारागिरांचे कौतुक केले.

प्रदर्शनीमध्ये या कलाकृतींचा समावेश : उत्तराखंड राज्यातील जैंबुन निशा (गारलँड मेकर), बिहार येथील सिंटू कुमार ( डॉल व टॉय मेकर), नागालँड येथील अखिरिली किरहा (सुतार), मध्यप्रदेश येथील रामनाथसिंग गुजर (मुर्तीकार), केरळ राज्यातून सतीष के.सी. (सोनार), ओडीशा येथील सुदिप्ता दास (मत्सजाळे कारागीर), झारखंड येथील गोपाल माडीया (लोहार), आंध्रप्रदेश येथील एम. हरीक्रिष्णा (न्हावी), छत्तीसगड येथील कांतीबाई साहू (बास्केट मेकर), आसाम येथील उपेंद्रा बरुहा (राजमिस्त्री), तेलंगणा येथील महाराजू लक्ष्मी (धोबी), पंजाब येथील कमल कुमार (मोची), उत्तरप्रदेश येथील राजाराम (कुंभार), जम्मू आणि कश्मीर येथील अब्दूल माजीद भट (बोट मेकर), महाराष्ट्रातील कीर्ति संतोषराव रावेकर (टेलर्स), कर्नाटक येथील शेखरप्पा कम्म (अस्त्रकार), राजस्थान येथील भोला लौहार (हातोडा व टुल किट मेकर) आणि गुजरात राज्यातील कमलेश परमार (कुलूप निर्मितीकार) यांचा समावेश आहे.

पी.एम. विश्वकर्मा योजने संदर्भात आयोजित प्रदर्शनी चा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Sat Sep 21 , 2024
– वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात – अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन – राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्गाटन – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ – ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनास प्रारंभ वर्धा :- पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com