पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 एप्रिल रोजी पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे करणार उद्‌घाटन

परदेशातील 171 प्रतिनिधी आणि भारतीय बौद्ध संघटनांचे 150 प्रतिनिधी या संमेलनात होणार सहभागी – जी के रेड्डी

नवी दिल्ली :- आगामी पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेबाबत केंद्रीय सांस्कृतिक पर्यटन मंत्री जी के रेड्डी यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 एप्रिल रोजी नवी दिल्लीत पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे उदघाटन करणार असल्याची माहिती जी के रेड्डी यांनी दिली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (IBC) च्या सहकार्याने 20-21 एप्रिल रोजी नवी दिल्लीत अशोक हॉटेल येथे हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार विविध उपक्रम, स्मरणोत्सव आयोजित करत आहे आणि पहिली आंतरराष्ट्रीय बौद्ध शिखर परिषद भारतात आयोजित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

विविध देशातील प्रमुख बौद्ध भिक्खू पहिल्यांदाच भारताला भेट देणार असून परिषदेत सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. बौद्ध तत्वज्ञान आणि विचारांचा आधार घेऊन समकालीन आव्हानांवर मात कशी करावी, यासंदर्भात या परिषदेत विचारमंथन होईल, असे ते म्हणाले. बौद्ध धर्माचा उगम भारतात झाला असून या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेमुळे त्यादृष्टीने बौद्ध धर्मामधील भारताचे महत्व अधोरेखित होईल, असे त्यांनी सांगितले. या दोन दिवसीय जागतिक बौद्ध परिषदेची संकल्पना “समकालीन आव्हानांना प्रतिसाद: तत्वज्ञान ते रूढ प्रघात” अशी आहे.

ही जागतिक शिखर परिषद, इतर देशांशी सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध वृद्धिंगत करण्याचे एक माध्यम ठरेल, असे जी किशन रेड्डी यांनी सांगितले. या परिषदेत सुमारे 30 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून परदेशातील सुमारे 171 प्रतिनिधी आणि भारतीय बौद्ध संघटनेचे 150 प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री संग्रहालयाला प्रत्येक नागरिकाने भेट द्यावी अशी पंतप्रधानांची विनंती.

Tue Apr 18 , 2023
नवी दिल्ली :- नवी दिल्लीतील प्रधानमंत्री संग्रहालयाला देशातील प्रत्येक नागरिकाने भेट द्यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. माजी पंतप्रधान दिवंगत, चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी प्रधानमंत्री संग्रहालयाच्या भेटीबद्दल केलेल्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधान म्हणाले; “चंद्रशेखर यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्वाचा सहवास लाभला आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले हे माझे सौभाग्य आहे. प्रधानमंत्री संग्रहालयात चंद्रशेखर यांच्यासह आपल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com