पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोहरादेवीत

– ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे लोकार्पण व सभा

– लाखो बंजारा बांधव उपस्थित राहणार

यवतमाळ :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी येत आहेत. सकाळी १० वाजता संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरने त्यांचे पोहरादेवी येथे आगमन होणार आहे.

येथे पोहोचल्यानंतर ते संत सेवालाल महाराज, धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीचे आणि जंगदबा देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर या ठिकाणी देशभरातील बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘बंजारा विरासत’, नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण करणार आहेत, या कार्यक्रमानंतर ते आयोजित जाहीर सभेस संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच पोहरादेवीत येत असल्याने समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

या कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कार्यक्रमाचे आयोजक तथा यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री, खासदार, आमदार , विविध राज्यातील बंजारा लोकप्रतिनिधी, समाजातील महंत आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता विशेष हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे पोहोचल्यानंतर ते जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण करतील. या कार्यक्रमानंतर आयोजित मुख्य सभेस संबोधित करतील. या कार्यक्रमास राज्यभरातील लाखो बंजारा समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.

येथे येणाऱ्या प्रत्येकास देशभरातील बंजारा समाजाचे संपूर्ण दर्शन व्हावे या दृष्टीकोनातून लोकनेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ-वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नाने पोहरादेवी विकास आराखड्यांतर्गत येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे भव्य नंगारा वास्तुसंग्रहालय साकारण्यात आले आहे. जागतिक दर्जाचे असे हे संग्रहालय तयार झाले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन बंजारा समन्वय समितीने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रिमंडळ बैठक : शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर 2024 एकूण निर्णय- 15 (भाग -1)

Sat Oct 5 , 2024
महसूल विभाग राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या गावातील गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरुपी माफ आहे. मात्र गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत असल्याने आणि शहरी भागात बहुमजली इमारती वाढत असल्याने अशा इमारतींखालील जमिनींचा संपूर्ण अकृषिक कर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com