बँकॉक येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी भारतीय दिव्यांग तिरंदाज संघाचे केले अभिनंदन

नवी दिल्ली :- बँकॉक येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय दिव्यांग तिरंदाज संघाचे अभिनंदन केले आहे.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;

“बँकॉक येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत मिळवलेला ऐतिहासिक विजय!

नेत्रदीपक कामगिरी करून इतिहासाच्या पानांवर स्वतःचे नाव कोरल्याबद्दल भारतीय दिव्यांग तिरंदाज संघातील लोकोत्तर खेळाडूंचे अभिनंदन!

4 सुवर्णपदकांसह एकूण 9 पदकांची कमाई करत या स्पर्धेत भारतीय पथकातील खेळाडूंनी त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे.

आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक वाटत आहे. यापुढील काळात देखील अशीच अभिमानास्पद कामगिरी त्यांच्या हातून घडो होच सदिच्छा.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Winter Session : 500 हून अधिक गाड्यांचा ताफा

Thu Nov 23 , 2023
– मे. मनीषा ट्रेव्हलर्स नागपूर आणि मे. आशिर्वाद ट्रेव्हलर्स नागपूर या दोन कंपन्यांना मिळाले आहे.    नागपूर (Nagpur) :- नागपुरात होणाऱ्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session Maharashtra Assembly) कोट्यवधींचा खर्च केला जातो. अधिवेशनाच्या काळात संपूर्ण सरकार नागपुरात येते. मग त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय, बाहेर येणे जाण्याची सोय करावी लागते. याच्याशी संबंधित कोट्यवधींची अनेक कामे केली जातात. नुकतेच आरटीओने मंत्री, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com