नागपूर – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या नियोजित दौऱ्याप्रमाणे सकाळी नऊ वाजता गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष हेलिकॉप्टरने प्रयाण केले. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी यावेळी राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद उपस्थित होते. एक वाजता त्या नागपूरला पुन्हा पोहोचणार असून चार वाजता कोराडी येथील कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.