‘महाज्योती’तर्फे आयबीपीएस-एलआयसीच्या अधिकारी पदासाठी पूर्वतयारी प्रशिक्षण

 राज्यातील 600 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणासह मिळणार दरमाह 6 हजार विद्यावेतन

 नागपूर-संभाजीनगरात प्रत्येकी 300 उमेदवार घेतील धडे

नागपूर :-  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या‎ संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त‎ जाती-भटक्या जमाती व विशेष मागास‎ प्रवर्गातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकयुगात समान संधी प्राप्त व्हावी याकरिता परीक्षेची पूर्वतयारीकरिता प्रशिक्षण देण्यात येते. याचाच भाग म्हणून यंदा 2023-24 सालात इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) तसेच भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसीे)तर्फे असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (एएओ) या पदासाठी महाज्योतीमार्फत नागपूर व छत्रपती संभाजी नगर या‎ दोन शहरात एकूण 600 विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना येत्या 21 स्पटेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. विशेष म्हणजे, 6 महिने घेण्यात होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे निवड झालेल्या विद्यार्थी ज्यांची हजेरी 75 टक्के असणार अश्याना दरमाह 6 हजार रूपए विद्यावेतन संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

त्यांनी सांगितले की, महाज्योती या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बॅंक आणि एलआयसीच्या होणाऱ्या अधिकारी पदांच्या परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. या प्रशिक्षणाचा‎ लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास‎ वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व‎ विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.‎ तसेच उमेदवार हा नाॅन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावे. जे विद्यार्थी हे पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा या प्रशिक्षणकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतात. उपरोक्त होणाऱ्या प्रशिक्षणाकरिता 30 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहे. तसेच अनाथांसाठी 1 टक्के जागा आरक्षित करण्यात आली आहे. या प्रशिक्षणची वयोमर्यादा ही 20 ते 33 असणार असल्याचेही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

 21 सप्टेंबरपर्यंत मागविले ऑनलाईन अर्ज

महाज्योतीच्या संकेतस्थळावर सूचना फलक (नोटीस बोर्ड) या पर्यायात जाऊन ‘आयबीपीएस-पीओ, एलआयसी-एएओ-2023-24’ ला भेट द्यायची आहे. यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचा अर्ज हा स्वीकृत होणार. तसेच पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी परीक्षा घेऊन प्रशिक्षणसाठी निवड करण्यात येणार, अशी माहिती महाज्योतीतर्फे देण्यात आली.

 अर्ज करतांना लागणार ही कागदपत्रे

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करतांना आधार कार्ड, जातीचा प्रमाणपत्र, वैध नाॅन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, पदव्युत्तर उत्तीर्ण गुणपत्रक किंवा पदव्युत्तरच्या शेवटचा वर्षाचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास 40 टक्के पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला आणि बँकेचे खाते जे आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न असावेत, असेही महाज्योतीतर्फे कळविण्यात आले आहे.

 अधिक माहितीसाठी कॉल सेंटरची सुविधा

अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून महाज्योतीतर्फे काॅल सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी 0712-2870120/21 या संपर्क क्रमांकावर किंवा इमेल आईडी: महाज्योतीनीट24 /जिमेल.काॅम वर आपल्या अर्जातील साषंकता दुरू करता येणार. विद्यार्थ्यांना 21 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. टपाल किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही महाज्योतीकडून सांगण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Urban Cell Demanded Safety audit for every Swimming pool in school and hotels in the Nagpur city area

Wed Aug 23 , 2023
Nagpur :- With no government department accountable for ensuring the standards maintained for all swimming pools in city, swimmers are left at the mercy of pool managements. Almost 50 to 60 per cent of swimming pools are not licensed, adequate safety measures are not taken and trained coaches are not appointed. Recently many drowning cases have been reported in city […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com