चवदार तळे सत्याग्रह, वर्धापन दिन व डॉ.बाबसाहेब आंबडेकर जयंती दिनानिमित्त पूर्व तयारी बैठक संपन्न

नवी मुंबई :- चवदार तळे सत्याग्रहाच्या 96 व्या वर्धापनदिन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने पूर्वतयारी आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली कोकणभवन येथे समिती सभागृहात पार पाडली.

याआढावा बैठकीवेळी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, दूरदर्श्यप्रणालीद्वारे नवी मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी किरण पाटील,महाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, रायगड अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झाडे, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) अमोल यादव, रायगड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, कोकण रिपब्लीकेशन सामाजिक संस्था,युनायटेड बुधिष्ट संस्थेचे पदाधिकारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समिती सरचिटणीस नागसेन कांबळे, भन्ते, आदी उपस्थित होते.

डॉ.कल्याणकर यावेळी म्हणाले की, 20 मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रहाचा 96 व्या वर्धापन दिनानिमित्त अनुयायाची मोठया संख्येने होणारी उपस्थिती पाहता सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. शासकीय मानवंदना देण्याबाबत उचित कार्यवाही करणे, सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधून कार्यक्रम सुरळित पार पाडणे, कार्यक्रमस्थळी स्वच्छता निवास व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, चवदार तळे परिसर देखभाल व दुरुस्ती, पार्किग व्यवस्था, दिशादर्शक माहिती फलक आदी सर्व व्यवस्था पार पाडण्याचे सूचना केल्या. त्याच बरोबर भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती दिनी हेली कॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणे, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, पुस्तक वाटपाकरिता स्टॉल, कायदा व सुव्यवस्था राखणे,अनुयायांनाच्या सोयी करिता आवश्यकत्या सर्व बाबींचा व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी डॉ.कल्याणकर यांनी आढावा बैठकीत दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारणार - उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

Fri Mar 15 , 2024
मुंबई :- सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मौजे वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरीता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे विभागाचे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे. यामध्ये अद्ययावत अशा सर्व सुविधा असणार आहे. विभागातील अधिकारी, जवान, कर्मचारी यांच्या क्षमता वृध्दीसाठी प्रशिक्षण केंद्र उपयोगी ठरणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्री  देसाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com