नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी चे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षाभूमी येथील स्तुफाच्या आत संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. याशिवाय संविधान चौक, विमानतळ आणि इंदोरा बुध्द विहार येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला. या प्रसंगी भंते नागसेन, भंते भीमा बोधी, भंते धम्मबोधी, भंते धम्मविजय, भंते मिलिंद, संघप्रिया उपस्थित होत्या.