यवतमाळ :- ज्या विद्यार्थ्यांनी कंबाईन्ड डिफेन्स सव्हींसेस या परीक्षेकरीता अर्ज केलेला आहे. अशा विद्यार्थ्यांकडून सीडीएस या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे राज्य शासनातर्फे दि. २० जानेवारीते ४ एप्रिल या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६४ चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारीपदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि.१४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी फेसबुक, वेब पेज डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर, पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्च करुन सीडीएस कोर्स क्रमांक ६४ कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या ०२५३-२४५०३२ या दुरध्वनी क्रमांकावर प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.