संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील पांढरकवडा येथे, मंडळ कृषी अधिकारी सुहास अंबुलकर यांचे मार्गदर्शनात, खरिप पूर्व हंगाम नियोजन सभा घेण्यात आली. सदर सभेत शेतकऱ्यांना पुर्व मशागत, बियाणे निवड, लागवड पद्धत, बीजप्रक्रिया, उगवणक्षमता तपासणी, ई विषयावर माहिती देऊन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक घेण्यांत आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक मनीष मालोदे, कृषी सहायक अश्विनी साखरे, आत्माचे नाशिक जांभुळकर, दर्शना नाटकार तसेच शेतकरी सर्वश्री बाबाराव ठाकरे, प्रकाश ठाकरे, प्रशांत शिंगारे, जीवन ठाकरे व गावातील इतर शेतकरी उपस्थित होते.