गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदान कायद्यान्वये गुन्हा

– अवैध केंद्राची माहीती देणाऱ्यास शासनातर्फे १ लाखाचे बक्षीस

– स्टिंग ऑपरेशनसाठी २५ हजाराचे बक्षिस

चंद्रपूर :- गर्भपात व सोनोग्राफी केंद्रांवर अवैधरित्या गर्भलिंगपरिक्षण करणे व स्त्रीभ्रूण हत्या करणे हा कायद्यान्वये गुन्हा असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या खबरी व्यक्तीस १ लाख रुपयांचे बक्षीस शासनातर्फे व स्टिंग ऑपरेशनसाठी तयार होणाऱ्या गर्भवती महिलेस २५ हजारांचे बक्षीस चंद्रपूर मनपातर्फे देण्यात येणार आहे.

गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा २००३ कायद्यान्वये गरोदरपणापूर्वी लिंग निवड करणे किंवा गरोदरपणात गर्भलिंग जाणून घेणे गुन्हा आहे. ज्या दांपत्यास एक किंवा दोन मुली आहेत व मुलगा नाही, त्या दांपत्याचा गरोदरपणी गर्भलिंग जाणून घेण्याकडे कल असतो व मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात केला जातो, यास कायद्याने बंदी आहे.

कोणत्याही जोडप्यास गर्भलिंग चाचणीसाठी प्रवृत्त करु नये किंवा गर्भवती महिलेने गर्भलिंग निदान करुन घेऊ नये. गर्भलिंग निवडीशी निगडीत सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर, दवाखाना किंवा प्रयोगशाळा यांच्या विषयी माहिती मिळाली, तर त्या विषयीच्या पुराव्यांसहित मनपा आरोग्य विभागास संपर्क करून तक्रार दाखल करावी. तक्रारकर्त्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची नियमात तरतूद असुन अशी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.

गर्भलिंग जाणून घेणाऱ्या व्यक्तीस दंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते. गर्भलिंग कोणत्याही पध्दतीने सांगणाऱ्या संबंधित डॉक्टरवर या गुन्ह्याचा आरोप सिध्द झाल्यास डॉक्टरला कैद व दंड तसेच वैद्यकिय परीषदेमधील नोंदणी 5 वर्षापर्यत रद्द करण्याची तरतुद आहे. गर्भलिंग सांगणे किंवा जाणून घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तसेच हा अजामिनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात आपसात संमतीने खटला मागे घेता येत नाही.

खबरी बक्षीस योजना : गर्भधारणा प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध अधिनियम २००३ चे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास तशी माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयांचे बक्षीस शासनातर्फे देण्यात येईल. यासंदर्भात संबंधित डॉक्टरविरोधात न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतरच बक्षिसाची रक्कम दिली जाते.

स्टिंग ऑपरेशनसाठी बक्षिस योजना :

स्टिंग ऑपरेशनसाठी तयार होणाऱ्या गर्भवती महिलेस चंद्रपूर मनपातर्फे न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर २५ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल.

येथे नोंदवा तक्रार –

१. टोल फ्री क्र. १०४

२. हेल्पलाईन क्र. १८००२३३४४७५

३. www.amchimulgimaha.in

४. मनपा टोल फ्री क्रमांक १८००२५७४०१०

५. व्हाट्सअप क्रमांक ८५३०००६०६३

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण सर्व पोस्टे अंतर्गत नविन कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

Thu Jul 4 , 2024
नागपूर :- भारत सरकारने देशातील जुने कायदे बदलले आहे. त्यासोबत नवे कायदे संमत केले आहे. १) भारतीय न्याय संहीता २०२३ २) भारतीय साक्ष अधिनियम २०२३ ३) भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ सदर कायदयाचे ०१ जुलै २०२४ रोजी अंमलबजावणी होणार असुन त्या अनुषंगाने मा. श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत दिनांक ०१/०७/२०२४ रोजी नवीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com