प्रकाश पोहरे यांची ’इलना’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

– विवेक गुप्ता, अंकित बिश्नोई उपाध्यक्ष

– पुरुषोत्तम गावंडे मुख्यालय जनरल सेक्रेटरी

– विदर्भाला प्रथमच अध्यक्षपदाचा बहुमान

अकोला :- देशातील सर्वात मोठ्या भारतीय भाषिक वृत्तपत्र संस्था, इलनाची ८० वी वार्षिक आमसभा दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात इलनाचे माजी अध्यक्ष सुनील डांग यांच्या अध्यक्षतेखाली २३ऑगस्टला पार पडली, त्यात राष्ट्रीय अध्यक्षपदी देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांची अविरोध निवड करण्यात आली.

देशभरातील १८ राज्यातून आलेल्या इलनाच्या शेकडो सदस्यांनी पहिल्या सत्रात आमसभेच्या विषय सुचीवरील विषयांना एकमुखाने मान्यता दिली. त्यानंतर सदस्यांनी त्यांना भेडसावणार्‍या समस्या आणि त्या कशा सोडवता येतील यावर चर्चा केली. आरएनआई आणि डीएव्हीपीद्वारे निर्माण केलेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आणि प्रकाशकांचा अनावश्यक छळ थांबवण्यासाठी केंद्रीय माहिती मंत्री, आरएनआय आणि डीएव्हीपीच्या अधिकार्‍यांची भेट घेण्यात येईल, असे यावेळी ठरले.

१९४० साली स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या ह्या संस्थेचे बायलॉजमधे काळानुरूप काही बदल करून कार्यकारिणी सदस्य व प्रदेशाध्यक्षांसह राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची पदे व व्याप्ती आवश्यकतेनुसार वाढविण्यात येणार असल्याचे पोहरे यांनी सांगितले , त्याकरिता एक समिती नेमण्याचे ठरले.

त्यानंतर, ओरिसा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, यूपी, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आंध्र, केरळ इत्यादी राज्यातून आलेले इलनाचे सदस्य, वृत्तपत्र चालक आणि संपादक यांचे मधून कार्यकारिणी निवडली गेली. एकंदर २१ सदस्यांमध्ये दरवर्षी सात सदस्य निवृत्त केल्या जातात, तर अध्यक्ष त्यांच्या अखत्यारीत आठ सदस्य निवडू शकतात. मागील वर्षी निवडणूक होऊ शकली नाही, म्हणून मग यावर्षी १४ सदस्यांची निवड करण्याचे ठरले. त्यानुसार जाणिव पूर्वक १४ सदस्यांनीच नामांकन दाखल केल्यामुळे सर्व सदस्य अविरोध निवडले गेले केले. निवडून आलेल्या सदस्यांनी, बंद खोलीत केलेल्या चर्चेनंतर प्रकाश पोहरे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून टाळ्यांच्या गजरात एकमुखाने निवड करण्यात आली.

त्यानंतर प्रकाश पोहरे यांनी सन्मार्ग कोलकत्ताचे मालक, माजी राज्यसभा सदस्य व विद्यमान आमदार विवेक गुप्ता, यु पी मजेठीया बोर्डचे माजी सदस्य अंकित बिष्णोई यांची उपाध्यक्ष म्हणून, मासिक विश्वमंडल चे डॉ. संजय गुप्ता, हरियाणा मुख्यमंत्रांचे सल्लागार तथा संपादक रणदीप घनघास यांची जनरल सेक्रेटरी म्हणून आणि माजी विक्री कर आयुक्त तथा संपादक पुरुषोत्तम गावंडे यांची मुख्यालयाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांची कोषाध्यक्षपदी पोहरेंनी घोषणा केली.

इलनाचे माजी अध्यक्ष सुनील डांग यांना इलणाच्या माजी अध्यक्षाच्या प्लॅनिंग अँड गाईडन्स कमेटीचे चेअरमन करण्यात आले. एकंदरीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीबद्दल सुनील डांग यांनी सगळ्या सदस्यांना धन्यवाद दिले.

मीडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक डॉ.ललित भारद्वाज यांना यूपीचे प्रदेशाध्यक्ष, पंजाब केसरीचे सुदेश भूषण जैन यांना दिल्लीचे, सुधीर पांडा यांना ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष, दैनिक पुढारीचे संचालक योगेश बाळासाहेब जाधव यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.

लवकरच इतर राज्यातील कमिट्या घोषित करण्यात येतील असे पोहरे म्हणाले.

मूळचे आर्णी जिल्हा यवतमाळ येथील, मात्र आता दिल्लीत टायगर नावाने प्रसिध्द असलेले पत्रकार तथा संपादक अशोक वानखडे, महेश देवशेट्टी, संजय जैन वंदना सहयोगी, अशोक कौशिक, अशोक नवरत्न , दीपा जैन, रवी उदय यांची प्रकाश पोहरे यांनी कार्यकारणी मधे नियुक्ती जाहीर केली.

इलना कार्यकारणीच्या सभा यापुढे प्रत्येक राज्यात घेण्याचे आणि त्या त्या राज्यातील चांगले पत्रकार तथा ज्येष्ठसंपादक, कवी यांना सन्मानित करण्याचे सुद्धा ठरविण्यात आले. सर्वांनी इलनाची सदस्य संख्या वाढवण्याचे लक्ष निर्धारित केले.

नवनिर्वाचित राष्ट्रीयअध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी त्यांची निवड करून सदस्यांनी जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल आभार व्यक्त केले. आमसभेचे अध्यक्ष तथा निवडणूक अधिकारी म्हणून जे सहकार्य केले त्याबद्दल माजी राष्ट्रीय अध्यक्ष सुनील डांग यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.

स्वातंत्र्यपूर्व काळात १९४० साली महाराष्ट्रात स्थापन झालेली आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेल्या, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती अशांनी ज्या संस्थेच्या आमसभेला हजेरी लावली आहे, अश्या इलनाच्या ८०व्या आमसभेला १८ राज्यातून प्रकाशक आणि संपादक मोठ्या संख्येने हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण निलंबित

Wed Aug 28 , 2024
– आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नानंतर कारवाई – निलंबनाच्या कारवाईने अधिकारी वर्गात खळबळ नागपूर :- चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com