नागपूर :- बहुजन समाज पार्टीचे विदर्भ झोन इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे, पृथ्वीराज शेंडे, दादाराव उईके व नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात नागपूर शहर बसपाची कार्यकारीणी नियुक्त केली.
शहर प्रभारी म्हणून शादाब खान, सुमंत गणवीर, चंद्रशेखर कांबळे, शहर अध्यक्षपदी प्रकाश गजभिये, उपाध्यक्षपदी उमेश मेश्राम, शहर महासचिवपदी विलास मून, शहर सचिवपदी सचिन कुंभारे, शहर कोषाध्यक्षपदी विजय कैकाडे, शहर सदस्यपदी राजकुमार तांडेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली आहे.