प्रजापती नगर मेट्रो स्टेशन पर्यंत धावली मेट्रो

नागपूर, ०१ जनवरी : महा मेट्रो नागपूर अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि सीताबर्डी इंटरचेंज से लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान २६.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होत आहे आणि लौकरच १३.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होणार आहे. यात सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.५ किमी आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन दरम्यान ५ किमी मार्गिकांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी सेंट्रल एव्हेन्यू ते वैष्णोदेवी चौक स्टेशन दरम्यान महा मेट्रो तर्फे टेस्ट रन झाले होते. भौगोलिक परिस्थतीचा विचार केला असता त्या भागातील जागेच्या कमतरतेमुळे प्रजापती नगर स्थानकाचे काम अतिशय कठीण आणि आवाहनात्मक होते. पण तरीही महा मेट्रोने सर्व विषम परिस्थितींवर मात देत हे कार्य पूर्ण केले.

रिच-४ अंतर्गत असलेल्या सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मार्गिकेवर एकूण ९ स्थानके आहेत. ती, या प्रमाणे – कॉटन मार्केट, नागपूर रेल्वे स्टेशन, दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओली चौक, टेलिफोन एक्स्चेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक आणि सर्वात शेवटी प्रजापती नगर मेट्रो स्टेशन चा समावेश आहे. हि स्थानके प्रामुख्याने सेंट्रल एवेन्यूवर असल्याने पूर्व आणि पश्चिम नागपूर या मार्गिकेमुळे जोडले जाणार आहे.

महत्वाचे आहे कि नवीन वर्षात सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर स्टेशन आणि सीताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटिव्ह चौक स्टेशन दरम्यान यात्री सेवा सुरु करण्याचे महा मेट्रो चा महा मेट्रोचा प्रयत्न आहे. आणि याच अंतर्गत आज सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर स्टेशन दरम्यान टेस्ट रन आयोजित करण्यात आले. या मार्गिकेवर सिग्नलिंग, ओएचई (विद्युत खांब) आणि ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे.

सीताबर्डी ते प्रजापतीनगर रस्त्यावर तीन पूल आहेत. आनंद टॉकीजजवळील रेल्वे रुळावरील कॅन्टिलिव्हर पूल आणि रामझुल्याजवळील मेट्रोपूल हेही अतिशय आव्हानात्मक होते. प्रजापतीनगरजवळील एनएचआयच्या पुलाला मेट्रो जोडण्यात आली आहे. प्रजापती मेट्रो मार्गावर लवकरच मेट्रो ट्रेन सुरू करण्याचा संदर्भ देत अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मार्गावरील सर्व काम पूर्ण झाले आहे. लवकरच सीएमआरएसची तपासणी केली जाईल. सीताबर्डी इंटरचेंजपासून प्रजापती नगर स्थानकाचे अंतर सुमारे 8.8 किलोमीटर आहे. प्रजापतीनगर स्थानकाची उंची सुमारे 25 मीटर आहे. एनएचआय (महामार्ग) मुळे प्रजापतीनगर स्थानकाची उंची जमिनीपासून वाढली आहे. किचकट आणि जोखिमेचा कामामुळे कामाचा वेग कमी झाला.

या मार्गावर मेट्रो निर्माण कार्य करणे आव्हानपूर्ण. रेल्वे मार्गावर मेट्रो मार्ग निर्माण कार्य, रामझुला परिसर, सेंट्रल एव्हेन्यू मार्ग, प्रजापती नगर मेट्रो स्टेशन :

• आनंद टॉकीज संतुलित कँटिलिव्हर :
सीताबर्डी आणि कॉटन मार्केट स्थानकांदरम्यान नागपूर मेट्रोच्या रीच IV (सीताबर्डी ते प्रजापती नगर) चा भाग आहे. महाराष्ट्रात ते सर्वाधिक 231. 2 मीटर लांबीचे संतुलित कॅन्टिलिव्हर आहे आणि हे राज्यात अद्वितीय आहे. नागपूर जंक्शन हे देशातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे हे लक्षात घेऊन रेल्वे रुळांवर मेट्रो पूल बांधणे महा मेट्रोसाठी आव्हानात्मक काम होते.

• सेंट्रल एव्हेन्यू
पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा सेंट्रल एव्हेन्यू  हा मुख्य रस्ता असून या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काम सुरू असताना दोन्ही मार्गांवर वाहतूक सुरूच होती. या मार्गाला लागून असलेले गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ हे अशा शहरातील प्रमुख भाग आहेत. या सर्व क्षेत्रांना व्यावसायिक महत्त्व आहे. या भागात असलेल्या प्रचंड वर्दळीमुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. या मार्गावरील वाहतुकीचा मोठा प्रश्न मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यावर नक्कीच सुटणार आहे.

या मार्गाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता या मार्गावर विविध प्रकारच्या वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणावर असते. एकीकडे नागपूर शहराचा विस्तार होत असताना दुसरीकडे या मार्गावरील वाहतूकही झपाट्याने वाढत आहे. या मार्गाचे काम करताना मेट्रोने मोठी काळजी घेतली आहे. याठिकाणी मेट्रो मार्ग सुरू झाल्याने मेयो हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, कॉटन मार्केट, इतवारी बाजार आदी भागात जाणे अतिशय सोयीचे होणार आहे.

• प्रजापती नगर :
प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचे बांधकाम केवळ आव्हानात्मकच नाही तर अत्यंत जोखमीचेही होते. भौगोलिक दृष्टीकोनातून एका बाजूला डबल डेकर मेट्रो आणि दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गाचे प्लायओव्हर बांधणे यामध्ये मार्ग काढणे अवघड होते. महा मेट्रोने हे आव्हानात्मक काम स्वीकारले आणि प्लायओव्हरच्या पिलरचा वापर करून मेट्रोचा ट्रॅक तयार केला. पुराणा पार्डी नाका चौक येथे कामात प्रचंड वर्दळ असल्याने मोठ्या अडचणी येत होत्या. या चारही मार्गांवर वाहतुकीवर परिणाम न होता वाहतूक सुरू राहिली आणि मेट्रोचे काम सुरूच राहिले. या चौकातून मेट्रो मेट्रोच्या उभारणीने नकाशा बदलून टाकला. हा प्रमुख चौक महामार्गाला जोडलेला आहे, जो सर्वात मोठ्या कळमना बाजारपेठेसाठी वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

NCC Cadet wins Bronze at 16th Matsogi Do Nationals

Sun Jan 2 , 2022
Nagpur – Cadet Amodkumar J Sah of HA College Saoner, part of 20 Maharashtra Batallion NCC, Nagpur won a Bronze medal in the 16th National Matsogi Do Championship being held held at Kopargaon (Shirdi), Maharashtra from 31 Dec 21 to 02 Jan 22. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com