नागपूर :- प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगर येथील इयत्ता-8 च्या विद्यार्थ्यांनी सद्भावना द्वारका पदयात्रा दिनांक 29/10/23 ला सुरु होऊन यशस्वीपणे दिनांक 2/11/23 ला पूर्ण झाली आणि दिनांक 4/11/23 ला संध्याकाळी अहमदाबाद हावडा एक्सप्रेसने नागपूर ला विद्यार्थी परतले. शिक्षक आणि मेस कर्मचारी यांच्यासह एकूण 31 प्रहारी या पवित्र पदयात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी २६ ऑक्टोबर रोजी नागपूर ते द्वारका असा प्रवास सुरू केला. सर्वांनी भगवान द्वारकाधीशांचे दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि पोरबंदर ते द्वारका अशी सुमारे 108 किलोमीटरची पदयात्रा निघाली. प्रहारींनी द्वारकाधीशला जाताना सर्व मंदिरांना भेटी दिल्या. त्यांची पवित्र यात्रा संपवून प्रहारी, त्यांचे शिक्षक आणि कर्मचारी 4 नोव्हेंबर 23 रोजी संध्याकाळी नागपुरात परतले. मुख्याध्यापिका सौ.वंदना कुलकर्णी आणि इयत्ता 8 च्या वर्ग शिक्षकांनी स्टेशनवर सर्वांचे जंगी स्वागत केले.
दरवर्षीच अश्या द्वारका पदयात्रेचे आयोजन प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर तर्फे करण्यात येते. या द्वारका पदयात्रेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना, त्यांचे मानसिक संतुलन, आरोग्य, कणखरपणा, त्याचबरोबर देवावरील विश्वास निर्माण होणे यासाठी ही सद्भावना पदयात्रा आयोजित केली जाते आणि विद्यार्थी ही या पदयात्रेत अतिशय उत्साहाने सहभाग दर्शवितात. विद्यार्थ्यांना अशी अभिनव संधी दिल्याबद्दल पालकांनी,प्रहार मिलिट्री स्कूलच्या प्राचार्या व शाळा व्यवस्थापनाचे आभार मानले.