प्रहार मिलिटरी स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

नागपूर :- सी.पी.अ‍ॅण्ड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूल मध्ये 22 जून रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यशाचे उत्तुंग शिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ साजरा करण्यात आला. प्रहार मिलिटरी स्कूल मधील प्रहारी मोनीश अन्सारी 92.80% आणि प्रहारी कार्तिक मोटघरे 91% गुण प्राप्त केले. शाळेतील प्रथम प्रहारी मोनीश अन्सारी, प्रहारी कार्तिक मोटघरे यांना प्रत्येकी रुपये 5000 धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना 70% च्या वर गुण प्राप्त झालेल्या 14 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रुपये 1000 धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गणित विषयात पैकीच्या पैकी पूर्ण गुण घेणाऱ्या प्रहारी मोनीश अन्सारी शाळेतील टॉपर या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षिका अर्चना बनसोड यांच्यातर्फे 5000 रुपये रोख रक्कम देण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता पूजन करण्यात आले. शाळेचे अध्यक्ष अँड. अशोक बन्सोड, शाळेचे उपाध्यक्ष भालचंद्र कागभट, शाळेचे सचिव विजय कागभट, तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढवा, असे मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष निमंत्रण होते. त्यांनी मुलांचा कौतुकसोहळा सुखद नेत्रांनी अनुभवला. शाळेतील सर्व शिक्षक गण, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका विशालाक्षी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Relief in GST depicts positive mindset of the Government for promoting ease of doing business

Mon Jun 24 , 2024
– Traders complimented PM Modi and FM Sitaraman for great financial relief Nagpur :- The announcements made by Union Finance Minister Nirmala Sitharaman for the significant announcements in GST is first positive step of the newly elected Union Government and GST Council towards providing ease of doing business- said BJP MP Praveen Khandelwal who is also Secretary General of the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com