संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शेतकऱ्यांना एकाच छताखाली बियाणे,खते, कीटकनाशके व कृषी औजारासह इतर आवश्यक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात या हेतूने मोदी सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्र शेतकऱ्यांच्या जीवनात नवसमृद्धी आणत आहे.असे मत भाजप महाराष्ट्र प्रदेश व्यापारी आघाडी सदस्य अजय अग्रवाल यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातुन व्यक्त केले.
शेतकऱ्यांना बी बियाणे ,कीटकनाशके,रासायनिक खते, शेती उपयोगी विविध औजारे किंवा शेतीसाठी लागणाऱ्या तत्सम वस्तू खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानाचे उंबरठे झिजवावे लागत होते यामध्ये त्यांचा अमुल्य वेळ जात होता शिवाय पैसाही अधिक खर्च करावा लागत होता.शेतकऱ्यांचा हा त्रास कमी व्हावा,माती,पाणी,खते याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या महत्वाकांक्षी धोरणाने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र उघडले असून त्यानुसार कामठी तालुक्यात 5 ठिकाणी हे पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र उघडले आहेत ज्यामध्ये कामठी शहरात 1, वडोदा 2, गुमथळा 1, भुगाव 1 चा समावेश आहे. तर हे पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणत असल्याचे मत भाजप पदाधिकारी अजय अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.